
नवी दिल्ली : यांनी आज पुन्हा एकदा ''द्वारे नागरिकांपर्यंत आपलं म्हणणं पोहचवलं. आजच्या त्यांच्या भाषणात बिहारी व्यंजन असलेल्या लिट्टी-चोखाचाही उल्लेख आला. इतकंच नाही तर त्यांनी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ''ला भेट देण्याची नागरिकांना विनंती केली. यावेळी त्यांनी आपल्या 'हुनर हाट' भेटीचा अनुभवही श्रोत्यांशी शेअर केला. 'बिहारचं व्यंजन असलेल्या लिट्टी-चोखाचा भरपूर आनंद घेतला' असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
'भारतीय संस्कृतीचं समागम स्थळ' म्हणून त्यांनी हुनर हाटचा उल्लेख केला. दिल्लीच्या एका छोट्या जागेत संपूर्ण भारत समावला असल्याचं म्हणताना, हुनर हाटमध्ये जाऊन कलाकारांचा उत्साह वाढवण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. 'हुनर हाटच्या एका छोट्याशा जागेत आपल्या देशाची विशालता, संस्कृती, परंपरांच्या विविधतेचं दर्शन घडून येतंय' असं पंतप्रधानांनी म्हटलंय. हा कला प्रदर्शनासाठी एक मंच असला तरी लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम 'हुनर हाट'द्वारे पार पडतं असल्याचं त्यांनी 'मन की बात'मध्ये सांगितलं.