
अहमदनगर: आपल्या खास विनोदी व हजरजबाबी शैलीमुळं संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले किर्तनकार आता नव्या वादात सापडले आहेत. शिक्षकांविरोधात केलेल्या टिप्पणीची त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळं शिक्षक संघटना त्यांच्यावर नाराज झाल्या आहेत. ओझर येथे केलेल्या एका किर्तनात इंदुरीकर यांनी मुलगा-मुलगीच्या जन्माबद्दल वक्तव्य केलं होतं. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून महाराष्ट्रात वादळ उठलं होतं. ते शांत होत नाही तोच शिक्षक शाळेत कसा वेळ वाया घालवतात हे सांगणारी त्यांची एक क्लिप व्हायरल झाली आहे. वाचा: ३४ मिनिटांच्या तासिकेत शिक्षक हे पाच मिनिटं वर्गात जाण्यासाठीच घेतात. वर्गात गेल्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं आणि त्यानंतर आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला पाच मिनिटं घेतात. हे सगळं झाल्यावर उद्याच्या तासाला काय शिकवणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. त्यानंतर मग तास संपला हे सांगायची वेळ येते, असा अनुभव त्यांनी सांगितला होता. त्यांच्या या 'शिकवणी'मुळं शिक्षक संघटना प्रचंड नाराज झाल्या आहेत. वाचा: 'शिक्षकांना काहीच काम कसं नसतं हे इंदुरीकर महाराजांना सुचवायचं आहे. पण ते स्वत: एक शिक्षक आहेत हे त्यांनी विसरू नये. त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलिन करू नये,' असं शिक्षकांचं म्हणणं आहे. कठीण गोष्टी किर्तनातून सांगण्यासाठी किर्तनकारांकडून अनेकदा प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणं दिली जातात. मात्र, ते करताना किमान भान बाळगलं जावं. एखाद्याची अप्रतिष्ठा होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यायला हवी, असं मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. वाचा: