
मुंबई- अभिनेता आणि निर्माते यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांनी वॉन्टेड आणि नो एण्ट्री यांसारखे सुपरहिट सिनेमे एकत्र केले होते. मात्र २००९ मध्ये वॉण्टेड सिनेमानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यामुळे बोनी, सलमानचं नातं खराब झाल्याचं म्हटलं जातं. नुकत्याच एका मुलाखतीत बोनी यांनी सलमानशी दुरावा आल्याचं मान्य केलं. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोनी यांनी मुलगा अर्जुन कपूर आणि सलमानसोबतच्या नात्यावर चर्चा केली. बोनी म्हणाले की, 'अर्जुनला नेहमीच दिग्दर्शक व्हायचं होतं. त्यामुळे त्याला लॉन्च करण्याचा माझा असा कोणता प्लॅन नव्हता. पण एक दिवस त्याने मला फोन करून त्याला अभिनेता व्हायचं असल्याचं सांगितलं. यानंतर सलमानने अर्जुनला गाइड केलं आणि त्याला ग्रूम केलं. आज माझे आणि सलमानचे नातेसंबंध तेवढे चांगले नाहीत पण तो सलमानच होता ज्याने अर्जुनला अभिनयासाठी प्रोत्साहीत केलं. त्याचे हे उपकार माझ्यावर आयुष्यभर राहतील.' बोनी यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी अर्जुन आणि मलायकाच्या नात्यामुळेच सलमान, बोनी कपूर यांच्यातलं मैत्रीपूर्ण नातं तुटलं. मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुनसोबतच्या नात्यामुळेच मलायकाने अरबाजला घटस्फोट दिला असं म्हटलं जातं. दोघांच्या घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुनने ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं होतं. आपलं नातं मान्य केल्यानंतर अर्जुन आणि मलायका एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. याशिवाय दोघं अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमांना एकत्र जाताना दिसतात. दोघं लवकर लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र अर्जुनने त्यांच्या लग्नाला अजून वेळ असल्याचं सांगितलं.