आचार्य कृष्ण दत्त शर्माप्रसिद्ध टेनिसपटू याचा आज जन्मदिवस आहे. सोमदेवसह आज जन्मदिन असणाऱ्यांना वाढदिवसाच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.. आज वाढदिवस असलेल्यांना आगामी वर्ष कसे जाईल, यावर टाकलेला दृष्टिक्षेप.. नवीन वर्षात शुभ कार्य घडतील. फेब्रुवारी महिन्यात राजकीय क्षेत्रात असलेल्यांना लाभ होईल. मार्च महिन्यात शत्रूंपासून सावध राहा. एप्रिल आणि मे महिना शुभ फलदायक असेल. खर्चातून फायदा मिळेल. जून आणि जुलै महिन्यात भाग्योदयाचा योग आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे बौद्धिक, धार्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनावश्यक कारणांमुळे वाद निर्माण होतील. बौद्धिक क्षेत्रात असलेल्यांचा कार्यविस्तार ऑक्टोबर महिन्यात होईल. नोकरदारांना हव्या असलेल्या ठिकाणी बदली किंवा बढतीचे योग नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत आहे. मात्र, त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कौटुंबिक, सामाजिक स्थिती सामान्य राहील. त्यामुळे मन शांत होईल. महिलांसाठी लाभदायक वर्ष ठरेल. विद्यार्थ्यांनी मेहनतीत सातत्य ठेवले, तर अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. मंगळ ग्रहाचा प्रतिकूल परिणाम आपल्यावर वर्षभर होऊ शकतो. शक्य तेवढे अन्नदान करा.