
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहणारे कुटुंब म्हणजे कपूर घराणं. हिंदी चित्रपटसृष्टीत जवळजवळ 100 वर्षांपासून या घराण्याचं नाव आहे. या घराण्यातील जवळपास सगळेच उत्तम कलाकार आहेत. अभिनयाशी सर्वांचेच जवळचे नाते आहे. रणबीर कपूर, करीना कपूर आणि करिश्मा कपूर या पिढीने देखील या इंडस्ट्रीमध्ये तेवढंच नाव कामावलं आहे. अलीकडेच, नेटफ्लिक्सवर “डायनिंग विथ द कपूर्स” हा शो रिलीज झाला, ज्यामध्ये संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसले.
कपूर कुटुंबाच्या या शोमध्ये नंदा आणि नातू अगस्त्य नंदा देखील उपस्थित होते
दरम्यान कपूर कुटुंबाच्या या शोमध्ये जवळपास सगळेच सदस्य उपस्थित होते.फक्त आलिया भट तिच्या कामानिमित्त बाहेर असल्याने ती उपस्थित राहू शकली नाही असं सांगण्यात येत आहे. पण अजून एक खास गोष्ट म्हणजे या शोमध्ये कपूर कुटुंबाटात आणखी दोन खास व्यक्ती पाहायला मिळाल्या त्या म्हणजे अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि नातू अगस्त्य नंदा. हे दोघेही कपूर कुटुंबासोबत जेवणाच्या टेबलावर एकत्र दिसले. त्यांना पाहून चाहत्यांना देखील क्षणभर आश्चर्य वाटले. नव्या आणि अगस्त्य यांचे कपूर कुटुंबाशी नक्की काय नाते आहे आणि ते या शोमध्ये कसे हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता होती.
View this post on Instagram
रणबीरनेच केला खुलासा
तर नवेली नंदा आणि अगस्त्य नंदाचा कपूर कुटुंबाशी काय संबंध आहे याबद्दल स्वत: रणबीरनेच खुलासा केला आहे. रणबीरने स्वतः नव्या आणि अगस्त्यसोबतचे त्याचे नाते उघड केले. अन् तेही त्याच्या विनोदी शैलीत. खरं तर, शो दरम्यान नव्या देखील कपूर कुटुंबाबद्दल भरभरून बोलली. ज्याकडे रणबीरने नव्याकडे बोट दाखवत म्हटले, “ही माझी चुलत बहीण आहे, काहीही बोलू नका.”
नव्याचं कपूर कुटुंबाशी काय नात आहे?
पण रणबीरची बहीण रिद्धिमाने लगेच त्याला बरोबर उत्तर सांगत म्हटलं की “नव्या आपली भाची आहे, तू मूर्ख आहेस का?” पण रणबीरने ऐकले नाही. तो नव्याला त्याची चुलत बहीण म्हणत राहिला, ज्यामुळे सर्वजण हसतच होते. नव्याचे वडील निखिल नंदा हे रणबीर कपूरचे भाऊ आहेत. अभिनेत्याचे आजोबा राज कपूर यांना पाच मुले होती, ज्यात दोन मुलींचा समावेश आहे. राज कपूरची मुलगी रितू नंदा ही अमिताभ बच्चनचे व्याही आहेत. त्यांचा मुलगा निखिलने अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चनशी लग्न केले आहे.
single handedly carrying the kapoor legacy forward! #ranbirkapoor
pic.twitter.com/2yxznjbHEW
— RK (@vickkyhere) November 23, 2025
रणबीरला त्याचे आजोबा राज कपूर यांचे नाव कसे मिळाले?
या डॉक्यूमेंट्रीदरम्यान, रणबीर कपूरने त्याच्या नावाशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट देखील सांगितली. अभिनेत्याने स्पष्ट केले की त्याला त्याचे नाव त्याचे आजोबा राज कपूर यांच्याकडून मिळाले. खरं तर, राज कपूर यांचे पूर्ण नाव रणबीर राज कपूर होते, परंतु त्यांनी कधीही रणबीर हे नाव वापरले नाही. रणबीरने स्पष्ट केले की जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या कुटुंबाला R अक्षर असलेले नाव सापडत नव्हते. त्यानंतर त्याचे आजोबा शम्मी कपूर यांनी राज कपूर यांना त्यांचे पहिले नाव ऋषी कपूर यांच्या मुलाला देण्यास सांगितले. अशाप्रकारे रणबीरला त्यांचे नाव मिळाले. “डायनिंग विथ कपूर्स” ही डॉक्यूमेंट्री 21 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.