‘केम छो, ट्रम्प’, १.२५ लाख लोकांची उपस्थिती! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 13, 2020

‘केम छो, ट्रम्प’, १.२५ लाख लोकांची उपस्थिती!

https://ift.tt/2SDv0Hq
अहमदाबाद अमेरिकेचे अध्यक्ष हे फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचंही २४ फेब्रुवारीला अहमदाबाद विमानतळावर स्वागत करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये ट्रम्प यांचा भव्य रोड शो होणार असून, गेल्या वर्षी अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाप्रमाणेच 'केम छो, ट्रम्प' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला तब्बल १.२५ लाख लोकांची उपस्थिती असणार आहे. अहमदाबाद विमानतळावर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. त्यापाठोपाठ मोटेरा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. याच स्टेडियममध्ये यावेळी 'डाऊडी मोदी'च्या धर्तीवर 'केम छो, ट्रम्प' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जवळपास १.२५ लाख लोक उपस्थित राहणार आहेत. वल्लभभाई पटेल स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० इतकी आहे. तर १५ हजार लोकांची आसनव्यवस्था थेट स्टेडियममध्ये मुख्य स्टेजच्या भोवती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला १.२५ लाख लोक उपस्थित राहतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्राकडून गुजरात सरकारच्या संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, सुरक्षा व्यवस्थेची देखील जोरदार तयारी गेल्या दोन आठवड्यांपासूनच सुरू आहे. देशभरातील सामान्य नागरिकांसह आघाडीचे उद्योगपती आणि सिनेकलाकार देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमेरिकेचे दुतावास आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून गेल्याच आठवड्या भारतीय सरकारच्या सुरक्षा पथकासोबत या संपूर्ण जागेची पाहणी करण्यात आली आहे. २०१४ सालापासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गुजरात आणि विशेत: अहमदाबाद हे जागतिक नेत्यांच्या दौऱ्यांचं मुख्य आकर्षण झालं आहे. याआधी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिन्झो अबे आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे गुजरात दौऱ्यावर आले होते.