नौदलाच्या लढावू विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 23, 2020

नौदलाच्या लढावू विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित

https://ift.tt/32kZySP
नवी दिल्ली : नौदलाच्या (MiG-29K) या लढावू विमानाला पुन्हा एकदा अपघात झालाय. रविवारी सकाळी गोव्यामध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. अपघात झाला तेव्हा या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलं होतं. १०.३० च्या सुमारास या विमानानं हवेत झेप घेतली होती. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय. अपघाता दरम्यान विमानाचा वैमानिक सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. हा अपघात नेमका कसा घडला? याची चौकशी करण्यात येईल, असं नौदलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, एमआयजी २९ के या नौदलाच्या विमानाला अपघात होण्याचा हा गेल्या चार महिन्यांतील दुसरा अपघात ठरलाय.