सिंह: आनंद द्विगुणीत होईल, वाचा राशीभविष्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 15, 2020

सिंह: आनंद द्विगुणीत होईल, वाचा राशीभविष्य

https://ift.tt/38AlOKU
- पं. डॉ. संदीप अवचट मेष : अनेक अडचणींवर तोडगा सापडेल. आवडत्या व्यक्तीबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. आगंतुक व्यक्तींची भेट होईल. वृषभ : प्रतिभासंपन्न व्यक्ती भेटतील. मौल्यवान चीजवस्तू सांभाळा. आप्तेष्टांबरोबर वाद होतील असे विषय टाळणे योग्य राहील. मिथुन : आर्थिक ताळेबंद चोख ठेवा. पैशाचा गैरवापर करणे टाळा. मित्रमंडळींबरोबर सहलीला जाण्याचे योग. कर्क : व्यावसायिकांनी भागीदाराच्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक काहील. जवळच्या व्यक्तीबरोबर झालेले वाद संपुष्टात येतील. ध्यान व योगाचे महत्त्व पटेल. सिंह : आनंद द्विगुणीत करणाऱ्या घटना घडतील. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक कराल. परिवारातील लहान सदस्य कामात लुडबूड करतील. कन्या : सकारात्मकतेने वावर घडेल. आर्थिक लाभ होतील. संततीच्या अपेक्षा पूर्ण कराल. तुळ : कामकाजाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. एखादा संदेश आनंद वाढवेल. फावल्या वेळेत मित्रांबरोबर मौज कराल. वृश्चिक : तिऱ्हाईत व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता. पती-पत्नीमध्ये आज एकमत होणे अशक्य. संध्याकाळी उद्यानांमध्ये फेरफटका माराल. धनु : कनिष्ठ सहकाऱ्यांवर प्रभाव राहील. वाचनाचा आनंद लुटाल. आवडत्या व्यक्तीपासून काही काळ दूर जावे लागेल. मकर : निसर्ग सौंदर्यात रमाल. व्यापारी वर्गाने ग्राहक देवो भव: या भावनेने वागावे. मोकळ्या वेळेत आवडते छंद जोपासाल. कुंभ : पालकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण कराल. आर्थिक बचत करून साठवलेली रक्कम एखादी कठीण सोडवेल. बेरोजगारांना नोकरीसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. मीन : जवळच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळणे अशक्य. सहकाऱ्याकडून एखादी भेटवस्तू मिळेल. महत्त्वाची कार्यालयीन कामे वेगाने पूर्ण कराल.