सचिनला पुन्हा बॅटिंग करणार; तेही मुंबईत! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 14, 2020

सचिनला पुन्हा बॅटिंग करणार; तेही मुंबईत!

https://ift.tt/38sz18e
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहण्याची संधी गेल्या साडेपाच वर्षात चाहत्यांना मिळली नाही. सचिनने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर गेल्या रविवारी ऑस्ट्रेलियात झालेल्या बुश फायर रिलीफ फंड सामन्यात सचिनने एक ओव्हर खेळली होती. सचिनच्या या खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्याच्या चाहत्यांनी स्टेटस म्हणून तो व्हिडिओ ठेवला होता. आता पुन्हा एकदा सचिनला बॅटिंग करताना पाहण्याची संधी आहे आणि ती देखील मुंबईत.... सचिनने गेल्या रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानात साडेपाच वर्षानंतर बॅट हातात घेतली. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू अ‍ॅलिस पॅरीने सचिना एक ओव्हर खेळण्याचे आव्हान दिले होते. बुश फायर सामन्यात एक डाव झाल्यानंतर मधळ्यावेळेत सचिनची बॅटिंग जगातील कोट्यवधी चाहत्यांना पाहता आली. याचा व्हिडिओ आयसीसीने देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. वाचा- आता सचिनच्या भारतातील चाहत्यांना मुंबईत त्याची बॅटिंग पाहता येणार आहे. अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा पहिला सामना सचिन तेंडुलकरच्या इंडिया लिजंड्स विरुद्ध ब्रायन लाराच्या वेस्ट इंडिज लिजंड्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर ७ मार्च २०२० रोजी होणार आहे. अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ही टी-२० स्पर्धा पाच देशांमध्ये खेळवली जाणार असून यात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या देशातील दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. सचिन सोबत या स्पर्धेत भारताचा विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, , शिवनारायण चंद्रपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉन्टी ऱ्होड्स, हाशिम आमला, मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंता मेंडिस हे खेळाडू देखील असणार आहेत. वाचा- स्पर्धेतील ११ पैकी दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर, चार नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना २२ मार्च रोजी ब्रेबोन स्टेडियमवर होणार आहे. मुंबईतील सामना ७ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.