मोहातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण सरस्वती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 13, 2020

मोहातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण सरस्वती

https://ift.tt/2OPkGuS
स्वामी श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांची आज जयंती आहे. माघ महिन्यातील वद्य पंचमीला म्हणजेच ७ फेब्रुवारी १८३६ रोजी स्वामीजींचा जन्म झाला. स्वामी श्रीकृष्ण सरस्वती असेही त्यांना संबोधले जाते. दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष होते. सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वामीजी दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. कोल्हापुरातील कुंभार आळीत वास्तव्यास असल्याने ते मुख्यत: या नावाने ओळखले जात असत. बालपण व प्रारंभी कार्य कोल्हापूर येथील नांदणी ग्रामी राहणाऱ्या आप्पा भटजी व अन्नपूर्णा जोशी यांना गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या कृपेने हे अपत्य झाले. लहान कृष्णा मौजीबंधन होईस्तोवर काहीच बोलला नाही. कुलदैवत खंडोबाच्या आज्ञेने कृष्णा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे गेला. स्वामी समर्थ सकाळपासून कृष्णाची वाट पाहत होते. कृष्णा आल्यावर ते त्याला घेऊन रानात गेले व तेथे त्यांनी तीन दिवस वास्तव्य केले. स्वामी समर्थांनी कृष्णाचे नामकरण श्रीगुरुकृष्ण असे केले. काही दिवस झाल्यावर स्वामी समर्थांनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला परतण्याची आज्ञा केली. अवतार कार्य महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळीतील ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंपासून मानवास मुक्त करणे व त्याचे देवस्वरूप दाखविण्याचे काम श्रीकृष्ण सरस्वती यांनी केले. या वाड्याला स्वामीजींनी वैराग्यमठी असे नाव दिले. स्वामीजी अखंड बालभावात राहत असल्यामुळे अनेक जण त्यांना एका वेडा समजत. स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केल्याचे उल्लेख ग्रंथात आढळून येतात. गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणाऱ्या अनेक भक्तांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन, करवीर येथे मी कुंभार स्वामी या नावानी अवतार घेतला असून तेथे जावे, असे सांगितले. स्वामीजी त्यांना भेटत असत व काही वाक्ये बोलून खूण पटवत असत. स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर जात नसत. मात्र, अनेकदा नरसोबाच्या वाडीस काही लोकांना स्वामींची भेट होत असे. तसेच अक्कलकोटवासी स्वामी समर्थांनी अवतारकार्य समाप्त केल्यानंतर काही भक्तांना, मी कुंभारस्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे, असे दृष्टांत स्वामी समर्थांनी दिल्याच्या आख्यायिका आहेत. कृष्ण सरस्वती स्वामींनीदेखील त्या भक्तांना अक्कलकोट स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत, असे मानले जाते. अवतार समाप्ती श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज श्रावण वद्य दशमी म्हणजेच २० ऑगस्ट १९०० रोजी समाधीस्त झाले. स्वामींचे संपूर्ण चरित्र, स्वामींचे कोल्हापुरातील शिष्य गणेश नारायण मुजुमदार यांनी लिहिले असून, ते '' या नावाने प्रसिद्ध झालेले आहे.