
नवी दिल्ली : मध्ये घसघशीत विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आज ग्रहण करत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. रामलीला मैदानात त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्रीही पदाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण दिल्लीला आमंत्रण देण्यात आलंय. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक ऍम्बुलन्स रायडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्सल, ऑटो ड्रायव्हर यांचा समावेशही आहे. लाईव्ह घडामोडी :>> सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत रामलीला मैदानाजवळच्या रस्त्यांवर ट्राफिक दिसून येईल >> शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था म्हणून अनेक रस्ते बंद करण्यात आलेत. अनेक ठिकाणी ट्राफिकची व्यवस्था बदलली जाऊ शकते >> रामलीला मैदानाजवळ व्यावसायिक वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय >> खुद्द अरविंद केजरीवाल यांनी ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीकरांना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे >> केजरीवाल सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी रामलीला मैदानात जवळपास ४५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलीय