पंकजांच्या नाराजीची पक्षाकडून दखल; आमदारकी मिळणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 15, 2020

पंकजांच्या नाराजीची पक्षाकडून दखल; आमदारकी मिळणार?

https://ift.tt/2SwTHql
मुंबई: भाजपच्या नाराज नेत्या व माजी मंत्री यांचं अखेर राजकीय पुनर्वसन होणार आहे. भाजपकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत राज्य भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. येत्या एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्या जागा भरण्यासाठी विविध पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडं संख्याबळाचा मोठा आकडा असल्यानं काही उमेदवारांना त्यांना विधान परिषदेवर सहज पाठवता येणार आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. वाचा: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजांचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी पंकजांना पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना झाल्यामुळं पंकजा मुंडे पक्षावर नाराज होत्या. मधल्या काळात त्यांच्या पक्षांतराच्या वावड्याही उठल्या होत्या. पक्षातील नाराजांसोबत भगवानगडावर समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडण्याची घोषणाही केली होती. पंकजांच्या या नाराजीची गंभीर दखल घेतल्याचं सध्याच्या घडामोडींतून दिसतं आहे. वाचा: दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा यांना मराठवाड्यात चांगला जनाधार आहे. त्या भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. अनेक वर्षांपासून आमदार व राज्यात पाच वर्षे मंत्रिपद भूषवल्यानं त्यांना संसदीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा पक्षाला विधान परिषदेत होईल, असंही भाजपचं मत आहे. वाचा: