
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाजपकडून आज सभागृहात सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. सावरकरांबद्दल महाविकास आघाडीतील पक्षांच्या भूमिका परस्परविरोधी असल्यानं त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मराठी सक्तीचं विधेयकही सरकारकडून आणलं जाण्याची शक्यता आहे. लाइव्ह अपडेट्स: >> उद्या होत असलेल्या मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी सक्तीचं विधेयक येणार? >> भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता >> राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस