
मुंबई- जानेवारीत प्रदर्शित झालेला सिनेमा आजही बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात , सैफ अली खान आणि काजोलच्या मुख्य भूमिका होत्या. आतापर्यंत या सिनेमाने देशभरात २७० कोटींहून जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. महाराष्ट्रात नंतर सर्वात जास्त कमाई करणारा तान्हाजी हा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने आतापर्यंत १४१ कोटींची कमाई केली असली तरी अनेक चित्रपटगृहात हा सिनेमा पाहण्यासाठी रांग लागत आहे. सुपरस्टारच्या सिनेमांना टाकलं मागे.. अजयच्या तान्हाजीने आमिरच्या दंगल सिनेमाला जवळपास ३७ कोटींच्या अंतराने मागे टाकलं आहे. भलेही १८५.७६ कोटींची कमाई करणारा बाहुबली २ सिनेमा सर्वांपेक्षा पुढे आहे. तरी तान्हाजीने , रणबीर कपूर आणि अन्य स्टार्सच्या सिनेमांना महाराष्ट्रात मागे टाकलं आहे. इथे पाहा संपूर्ण यादी 1. बाहुबली 2- 1,85,76,00,000 2. तान्हाजी: द अनसंग वॉरियर- जवळपास 1,41,00,00,000 (45 दिवसांचा आकडा) 3. दंगल- 1,04,26,00,000 4. पीके- 1,04,21,50,000 5. टाइगर जिंदा है- 1,04,40,00,000 6. संजू- 1,01,86,00,000 7. बजरंगी भाईजान- 90,77,00,000 8. सिम्बा- 89,33,00,000 9. कबीर सिंह- 87,21,50,000 10. गोलमाल अगेन- 87,08,50,000 11. सुल्तान - 86,30,50,000 12. उरी: द सर्जिकल स्ट्राइक- 84,11,00,000 13. 3 इडियट्स- 79,19,00,000 14. हाउसफुल 4- 79,03,50,000 15. पद्मावत- 78,86,00,000 16. वॉर- 77,42,50,000 17. धूम 3- 76,42,50,000 18. प्रेम रतन धन पायो- 70,79,00,000 19. चेन्नै एक्सप्रेस- 68,48,00,000 20. बाजीराव मस्तानी- 67,43,00,000