जन्मदिवस भविष्यः गुंतवणुकीतून लाभाचे वर्ष - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 4, 2020

जन्मदिवस भविष्यः गुंतवणुकीतून लाभाचे वर्ष

https://ift.tt/2PIWB9F
आचार्य कृष्ण दत्त शर्माप्रसिद्ध टेनिसपटू रोहन बोपण्णा यांचा आज जन्मदिवस आहे. रोहन बोपण्णा यांच्यासह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा... आज जन्मदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला हा आढावा... आगामी वर्ष चंदेरी यश देणारे ठरेल. मार्च महिन्यात राजकीय क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना लाभ होईल. एप्रिल महिन्यात हितशत्रूंशी सावध राहावे लागेल. मे आणि जून महिना ग्रहमानाच्या दृष्टिने स्थिर असेल. एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कौशल्य वापरून कामे पार पाडावी लागतील. बौद्धिक, धार्मिक आणि व्यवसायिक प्रयत्नांमुळे समस्या दूर होतील, यश मिळेल. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत प्रापंचिक कारणांमुळे त्रास होईल. नोव्हेंबर महिना कार्यविस्तारणाला ठरेल. नोकरदार वर्गाला इच्छा असेल, तेथे बदलीचे योग डिसेंबर महिन्यात येतील. मात्र, त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. जानेवारी २०२१ महिना समाधानकारक जाईल. फेब्रुवारी महिन्यात सर्व परिस्थिती सामान्य होईल. मानसिक शांतता लाभेल. आगामी वर्ष महिलांसाठी शुभफलप्रदायक ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्यासाठी मेहनत करणे क्रमप्राप्त आहे. आगामी वर्षात मंगळ ग्रहाचा प्रभाव परिणामकारक असेल.