मुख्यमंत्री केजरीवाल पंतप्रधानांच्या भेटीला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 3, 2020

मुख्यमंत्री केजरीवाल पंतप्रधानांच्या भेटीला

https://ift.tt/3cpAizf
नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. दोन्ही नेत्यांची ही भेट संसद भवन परिसरातील पंतप्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आलीय. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळल्यानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. नव्यानं सत्ता हातात घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सतत केंद्रासोबत मिळून काम करण्याची भूमिका घेतलीय. नुकतीच त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचीही भेट घेतली होती. राजधानी दिल्लीत नुकत्याच उसळलेल्या हिंसेत तब्बल ४६ जणांचा बळी गेलाय तर २०० हून अधिक जण जखमी झालेत. यामध्ये ११ पोलिसांचाही समावेश आहे. हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी क्राईम ब्रान्चच्या दोन एसआयटी गठीत केल्या आहेत. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर आम आदमी पक्ष आणि भाजप आमने-सामने आहेत. दोन्ही पक्ष दिल्ली हिंसाचारासाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, जवळपास महिनाभरापूर्वी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण ७० जागांपैकी आपला ६२ जागांवर विजय मिळालाय तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडमुकीतही काँग्रेस आणि इतर पक्षांना नागरिकांनी मत न देणंच योग्य समजलं. या निवडणुकीसहीत आपनं विधानसभेची हॅट्रिक साधली.