शेअर निर्देशांक तेजीत ; गुंतवणूकदारांची भरपाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 2, 2020

शेअर निर्देशांक तेजीत ; गुंतवणूकदारांची भरपाई

https://ift.tt/2PENFBV
मुंबई : मागील आठवडाभरात गुंतवणूकदारांची झोप उडवणाऱ्या शेअर निर्देशांकांनी आज आठवड्याची सुरुवात मात्र दमदार केली आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ७५० अंकांची झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील सेन्सेक्सला साथ करत १५० अंकांच्या तेजीत आहे. या तेजीने गुंतवणूकदारांची जवळपास २ लाख कोटींची भरपाई झाली आहे. जगभरातील भांडवली बाजारावर करोनाची दहशत कायम आहे. मागील आठवडाभरात आशियापासून अमेरिकेपर्यंतचे सर्वच प्रमुख शेअर बाजारांमध्ये जबरदस्त पडझड झाली होती. या गुंतवणूकदारांनी लाखो कोटी गमावले होते. मात्र आज आशियात निर्देशांकांनी सकारात्मक सुरुवात केली. सिंगापूर शेअर बाजारात तेजीसह सुरु झाला. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि खरेदीचा ओघ सुरु केला. बाजारात बँकिंग, वित्त सेवा, इन्फ्रा, आयटी, एफएमसीजी या क्षेत्रात खरेदी सुरु आहे. आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक बँक, सन फार्मा, एचडीएफसी, एचसीएल टेक, महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस, आयटीसी हे शेअर तेजीत आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७२.०९ वर आहे.