नवी दिल्ली: आज संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दिल्लीत झालेल्या दंगलीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी संसदेत केंद्र सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. काही पक्षांनी या विषयावरील चर्चेसाठी नोटीसही दिली आहे. पाहुयात लाइव्ह अपडेट्स... Live अपडेट्स...>> लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित >> काँग्रेसचे नेते राहुल गांधी संसदेत पोहोचले >> डोळ्यांवर काळी पट्टी आणि तोंडावर बोट.... तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला निषेध. >> : टीएमसी खासदारांनी डोळ्यांवर काळी पट्टी बांधत नोंदवला निषेध. विरोधी पक्षांचे खासदार काळी पट्टी बांधून करत आहेत निषेध. >> दिल्ली दंगलीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने लोकसभेत दिला स्थगन प्रस्ताव >> तृणमूल काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, एनसीपी आणि डीएमकेने दिल्ली दंगलीबाबत लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली >> दिल्ली दंगलप्रकरणी टीएमसी, सीपीआय, एसीपी आणि डीएमकेने मांडला स्थगन प्रस्ताव >> काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि के. सुरेश यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला