एकनाथ खडसेंना काँग्रेसकडून विधान परिषदेची ऑफर? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 10, 2020

एकनाथ खडसेंना काँग्रेसकडून विधान परिषदेची ऑफर?

https://ift.tt/2zspdyl
मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळं नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यांना काँग्रेसनं पक्ष प्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी खडसे यांनी आगामी विधान परिषद निवडणूक लढवावी, अशी अट काँग्रेसकडून घालण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजप चार, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन तर काँग्रेस एक जागा लढवू शकणार आहे. मात्र, या निवडणुकीत दोन जागा लढण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे. त्यासाठी एक उमेदवार घोषित करण्यात आला आहे. दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसनं खडसे यांच्याशी संपर्क साधल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. भाजपकडून सातत्यानं डावललं जात असल्यानं खडसे हे अस्वस्थ आहेत. ते पक्षांतराच्या निर्णयाप्रत आल्याचं सांगितलं जातं. भाजपला सोडचिठ्ठी देण्यासाठी त्यांच्यावर समर्थकांचाही दबाव आहे. हीच संधी साधत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं त्यांना ऑफर दिली आहे. विधान परिषदेची दुसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला १४ अतिरिक्त मतांची गरज आहे. खडसे यांनी विधान परिषद निवडणूक लढण्याची तयारी दाखवल्यास ते भाजपची मतं सहज वळवू शकतात, असा काँग्रेसचा होरा आहे. पण सद्यस्थितीत खडसे उत्सुक नाहीत! काँग्रेसनं ऑफर दिली असली तरी सध्याच्या स्थितीत खडसे ती स्वीकारण्यास उत्सुक नाहीत. भाजपमध्ये अनेक आमदार नाराज आहेत. त्यांना वळवणं शक्य असलं तरी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळं प्रत्येकाशी संपर्क साधणं कठीण जाणार आहे. सगळं काही सुरळीत न झाल्यास पराभवाची भीती आहे. हा धोका पत्करण्यास खडसे तयार नाहीत. हमखास निवडून येणारी जागा मिळाल्यास ते काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेऊ शकतात, असं बोललं जात आहे.