आयुष्मानने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 5, 2020

आयुष्मानने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

https://ift.tt/3dctl48
मुंबई- बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. अभिनेता आयुष्मान खुरानाचा सध्या एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याने कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगितले. आयुष्मानने यावेळी स्वतःला 'स्ट्रेट' म्हणत मिळालेली मुख्य भूमिका नाकारली. तेव्हा टीव्हीत काम करायचा आयुष्मान- आयुष्मानने २०१२ मध्ये विकी डोनर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यादरम्यान त्याने स्ट्रगलच्या काळातला जुना अनुभव शेअर केला. आयुष्मान म्हणाला की, त्यावेळी तो टीव्हीमध्ये काम करत होता आणि कास्टिंग डायरेक्टर त्याच्याकडून लैंगिक सुखाची मागणी केली होती. आयुष्मानने दिलं उत्तर- आयुष्मान म्हणाला ही तेव्हा तो टीव्ही अँकर होता. तेव्हा सोलो टेस्ट व्हायचे. कास्टिंग डायरेक्टरने थेट त्याच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. त्याला तेव्हाच भूमिका मिळेल जेव्हा तो ही मागणी मान्य करेल. यावर आयुष्मानने त्याला तो 'स्ट्रेट' असल्याचं सांगितलं. याशिवाय जर तो 'स्ट्रेट' नसता तर एखादवेळेस त्याने विचारही केला असता असं आयुष्मान म्हणाला. पण तो हे करू शकत नसल्याचं म्हणाला. स्वीकारावे लागले अनेक नकार- आयुष्मान पुढे म्हणाला की, नकार दिल्यावर त्याला अनेकांकडून नकार मिळत राहिला. याशिवाय जर कोणी बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी अशा ऑफरचा स्वीकारही करत असेल तर त्याला कोणीही जज करता कामा नये. पण कास्टिंग डायरेक्टरच्या अशा मागण्या अत्यंत चुकीच्या आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त गुणवत्ता महत्त्वाची आहे.