कोविड-१९: भारतात एका दिवसात ८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 31, 2020

कोविड-१९: भारतात एका दिवसात ८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

https://ift.tt/3dkLDRt
नवी दिल्ली: देशभरातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजारांच्या वर पोहोचली असून शनिवारी दिवसभरात ८ हजारांहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. देशभरात मृत्युमुखी पडलेल्या एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५००० च्या वर पोहोचली. तर, फक्त शनिवारी एकूण २०० रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी हीच संख्या २७० इतकी होती. देशभरात एकूण १,८२,१४३ रुग्ण असून शनिवारी एकूण ८,०२६ नवे रुग्ण वाढले. दरम्यान, गुजरातमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुजरातमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४१२ नवे रुग्ण आढळले. तर पश्चिम बंगालमध्ये ३१७, उत्तर प्रदेशात २६२, मध्य प्रदेशात २४६, बिहारमध्ये २०८, हरयाणात २०२ कर्नाटकात १४१, आसाममध्ये १२८ नवे रुग्ण आढळले. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ४,३०० करोनाच्या रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत देशभरात एकूण ८६,६६० रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत स्थिती सर्वात वाईट असून गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. ही एखाद्या दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे. मुंबईत आतापर्यंत १,२२७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६५,१६८ झाली आहे. तर शनिवारी देशभरात २,९४० नव्या रुग्णांची नोंद झाली. २४ मे या दिवशी मात्र देशभरात करोनाचे ३,०४१ नवे रुग्ण आढळले होते. गुजरात राज्यात रुग्णांची संख्या १६ हजारांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात १००० नवे रुग्ण आढळले. तर गेल्या ४ दिवसात १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाचक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगाल राज्यातलही ३१७ नवे रुग्ण आढळले असून राज्यात एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे ५००० वर. जम्मू आणि काश्मीरमध्ये दिवसभरात १७७ नवे रुग्ण आढळले असून यांमध्ये १० गरोदर स्त्रियांचाही समावेश आहे. ओडिशात गेल्या २४ तासांमध्ये १२० नवे रुग्ण आढळले असून, यांमध्ये ४ करोनायोद्ध्यांचा समावेश आहे. ओडिशातील एकूण रुग्णांची संख्या आहे १,८४३. तर, बिहारमध्ये शनिवारी दिवसभरात २०८ नवे रुग्ण आढळले असून बिहारमध्ये एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे ३,५६५ वर. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २१ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर, एकूण रुग्णांपैकी १,३११ रुग्ण बरे झाले असून, राज्यात सध्या २,२३४ आहेत.