चटणी करताना अभिनेत्रीचं मिक्सरमध्ये अडकलं बोट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 31, 2020

चटणी करताना अभिनेत्रीचं मिक्सरमध्ये अडकलं बोट

https://ift.tt/2Apdwcx
मुंबई- सान्या मल्होत्राने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोत तिच्या करंगळीला दुखापत झालेली दिसत होती. या फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिलं की, '९ दिवसांनंतर मी माझ्या छोट्या बोटासोबत हजर आहे.. छोट्या बोटाची मोठी गोष्ट'रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी मिक्सरमध्ये तिची करंगळी अडकली होती. यामुळे तातडीने करंगळीचं ऑपरेशन करावं लागलं होतं. स्वतः सान्याने हा घडलेला किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. करंगळीला बांधली होती पट्टी- मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनमध्ये घरातच सान्यासोबत हा अपघात झाला. १४ मे रोजी तिच्या घरातील मिक्सरमध्ये बिघडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सान्या घरी चटणी करत होती. तिने मिक्सर सुरू केला असता त्याचं झाकण उडालं. ते झाकण परत लावण्याच्या गडबडीत तिचा हात आत गेला आणि करंगळीचा एक तुकडा वेगळा झाला. करोना टेस्ट केल्यानंतर केलं अॅडमिट सूत्रांनी सांगितलं की, तेव्हा सान्या घरी एकटी होती आणि रक्त वाहून गेल्यामुळे तिला चक्कर आली. तिने मित्राला फोन केला. मित्राने तिला इस्पितळात नेले. तिथे कोविड- १९ ची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच तिला भरती करण्यात आलं. सान्याला २ फ्रॅक्चर, १ डिसलोकेश आणि ३- ४ मोठे कट आले होते. याचमुळे तातडीने तिच्या बोटाचे ऑपरेशन करण्यात आले. सान्या आता ठीक असून सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.