स्त्री-पुरुष समानतेचे दिवे लावा; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 29, 2020

स्त्री-पुरुष समानतेचे दिवे लावा; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

https://ift.tt/2AiKzyK
बीड: करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साध्या पद्धतीनं साजरी होणार आहे. 'कार्यकर्त्यांनीही घरात राहूनच पुण्यतिथी साजरी करावी. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे दोन दिवे लावावेत आणि मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ घरात बनवावा,' असं आवाहन भाजपच्या नेत्या यांनी केलं आहे. येत्या ३ जून रोजी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची सहावी पुण्यतिथी आहे. मुंडे यांचे कार्यकर्ते व समर्थक हा दिवस 'संघर्ष दिन' म्हणून साजरा करतात. त्या निमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोपीनाथ गडावर कुठलाही मोठा सोहळा होणार नाही. त्याऐवजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोटासा कार्यक्रम होईल, असं पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. कोणीही गडावर गर्दी करू नये किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये,' असं त्यांनी सांगितलं आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या घरातच मुंडे साहेबांची पुण्यतिथी कशी साजरी करावी, असं पंकजा यांनी म्हटलं आहे. ती कशी करावी, हेही पंकजा यांनी सांगितलं आहे. घरातील पुरुष व स्त्रियांनी मुंडे साहेबांच्या फोटोच्या दोन्ही बाजूला उभं राहून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे दोन दिवे लावावेत. त्याशिवाय, मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ घरात बनवावा. करोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नदान, रक्तदान, मास्क व इतर औषधांचे वाटप करावे आणि हे सर्व करतानाचे फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवावे, असं आवाहन पंकजा यांनी केलं आहे. वाचा: