नवी दिल्ली : भारतात करोना व्हायरसच्या आकड्यानं ७० हजाराचा आकडा आलांडलाय. त्यामुळे, लोकांमध्ये या व्हायरसची एकप्रकारे दहशतच पसरलीय. या व्हायरसच्या विळख्यात अडकू नये, यासाठी अनेक नागरिकांची धडपड केविलवाणीही ठरतेय. अशा वेळी चुकीची तुम्हाला 'करोना पॉझिटिव्ह' सांगितलं गेलं तर अर्थातच तुमची चिंता अर्थातच वाढेल. परंतु, काही तास उलटून गेल्यानंतर तुम्ही 'पॉझिटिव्ह' नसून अगोदरचे रिपोर्ट चुकीचे होते असं सांगितल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया असेल...? असा प्रसंग खरोखरच घडलाय एअर इंडियाच्या काल पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच पायलटसोबत... रविवारी उड्डाणाअगोदर करण्यात आलेल्या चाचणीत हे पाचही पायलट करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. त्यामुळे त्यांना तत्काळ उड्डाण रद्द करून क्वारंटाईन करण्यात आलं. परंतु, करोना संक्रमणाच्या दुसऱ्या टेस्टमध्ये या पाचही पायलटमध्ये संक्रमण आढळलेलं नाही. एअर इंडियाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिलीय. परंतु या घटनेमुळे करोना टेस्ट किटच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आलाय. वाचा : वाचा : वाचा : टेस्टिंग किट खराब होते? आमच्या सर्व पायलटची दुसरी करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांच्यात करोना संक्रमण असल्याचं आढळलं नाही, असं एअर इंडियाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. हे पाचही पायलट बोईंग ७८७ विमान हाताळतात. सोमवारी सायंकाळी या पाच पायलटच्या दुसऱ्या करोना चाचणीचा 'निगेटिव्ह' रिपोर्ट हाती आला. त्यामुळे करोना चाचणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. एअर इंडियाच्या पाचही पायलटची करोना टेस्ट एकामागोमाग एक करण्यात आली होती. त्यामुळे, टेस्टिंग किटमध्ये त्रूटी असल्यामुळे हे घडलं असावं अशी शक्यता एअर इंडियाच्या सूत्रांनी व्यक्त केलीय. त्रुटीपूर्ण अँन्टीबॉडी रॅपिड टेस्ट रोखली याअगोदरही चीनमधून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सर्वात अगोदर राजस्थान सरकारनं अँन्टीबॉडी रॅपिड टेस्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आयसीएमआरनं या टेस्टिंग किटचा वापर रोखला होता. वाचा : वाचा :