सरकारने वाऱ्यावर सोडले; लाखो बेरोजगार होण्याची शक्यता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 26, 2020

सरकारने वाऱ्यावर सोडले; लाखो बेरोजगार होण्याची शक्यता

https://ift.tt/2yvhob8
नवी दिल्ली: केंद्र सरकारने करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पण या पॅकेजमध्ये , आणि क्षेत्रातील उद्योग व्यवसायांसाठी काहीच दिले नसल्याने नाराजी आहे. अन्य क्षेत्रा प्रमाणे या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. यामुळेच सरकारने किमान एका वर्षासाठी हॉलिडे आणि सॉफ्ट लोनची सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. वाचा- सरकारने जर कोणतीच मदत केली नाही तर या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे करोनामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा- पर्यटन, हॉटेल आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज लोकांनी सांगितले की, सरकारच्या पॅकेजमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू झाल्या पण पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. काही हॉटेल्सना होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. मल्टीप्लेक्स, चित्रपटगृह अद्याप बंदच आहेत. सलून आणि वेलनेस सेंटर देखील बंद आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे कामकाच ठप्प आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा- सध्या टूर आणि ट्रॅव्हल्स संबंधित कंपन्यांची अवस्था प्रचंड खराब असल्याचे ट्रॅव्हल एजेंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्योती मायल यांनी सांगितले. सरकारने काही प्रमाणात मदत केली पाहिजे असे ते म्हणाले. पर्यटन क्षेत्राला मदत केली नाही तर लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील असे कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे म्हणणे आहे. वाचा- करोनाचा सर्वात मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. पर्यटन उद्योगाची बाजारपेठ १८ लाख कोटी इतकी आहे. करोनाच्याआधी या क्षेत्रात ५.५ कोटी कर्मचारी काम करत होते. आता यातील लाखो लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. अशाच पद्धतीने देशातील हॉटेल व्यवसायात ४.२ लाख कोटी लोक काम करतात. यातील २० लाख नोकऱ्या जाण्याची शक्यात सीआयआने व्यक्त केली आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्र ४८ हजार कोटी रुपयांचे आहे. या क्षेत्रात ५ लाख जण काम करतात. यात २० टक्के कपात होऊ शकते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्र १.८२ कोटी रुपयांचे असून यात ७० ते ८० लाख लोक काम करतात. तर सलून आणि वेलनेस व्यवसाय १ लाख कोटी रुपयांचा आहे असून यात ५ कोटी लोक काम करतात. इव्हेंट उद्योग १० हजार कोटी रुपयांचा असून यात ३ कोटी लोक काम करतात. करोनामुळे ९० टक्के व्यवसाय संपल्याचे सीआयआयने म्हटले आहे.