क्राइम पेट्रोल फेम शफीक अन्सारी यांचं निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 12, 2020

क्राइम पेट्रोल फेम शफीक अन्सारी यांचं निधन

https://ift.tt/3bmcIBJ
मुंबई- फेम अभिनेते यांचं १० मे २०२० रोजी निधन झालं. अनेक वर्ष ते कर्करोगाशी लढा देत होते. पण त्यांची ही लढाई अपयशी ठरली. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शफीक यांच्या निधनावर सिंटाने व्यक्त केलं दुःख- शफीक यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. सिंटा (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन)ने शफीक यांच्या निधनावर ट्वीट करत दुःख व्यक्त केलं. सिंटाने ट्वीटमध्ये लिहिले की, 'आम्ही अन्सारी शफीक यांच्या निधनावर दुःख व्यक्त करतो. ते २००८ पासून सिंटाचे सदस्य आहेत.' शफीक यांनी सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अनेक वर्ष ते पोटाच्या कर्करोगाशी लढत होते. मात्र त्यांची ही लढाई अपयशी ठरली. शफीक यांनी क्राइम पेट्रोलशिवाय अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे.