महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणाऱ्या पोस्ट खपवून घेणार नाही: देशमुख - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 23, 2020

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणाऱ्या पोस्ट खपवून घेणार नाही: देशमुख

https://ift.tt/3d1eNos
मुंबई: सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करणे खपवून घेणार नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच सायबर क्राइम विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, असं राज्याचे गृहमंत्री यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियावरून महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सुरू झाल्यापासून सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. टिकटॉकवर अॅसिड अटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले गेले. त्याचीही गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. सायबर गुन्ह्यांप्रकरणी आतापर्यंत ४१० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २१३ जणांना अटक करण्यात आली आहे, असं सांगतानाच सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि अफवा पसरविणाऱ्या पोस्ट टाकू नका. तुमच्या प्रत्येक कृतीकडे महाराष्ट्र सायबर क्राइम विभाग लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी सांगितलं.