'या' महिन्यांमध्ये होणार करोना संसर्गाचा 'दि एन्ड'! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 24, 2020

'या' महिन्यांमध्ये होणार करोना संसर्गाचा 'दि एन्ड'!

https://ift.tt/36r24J4
लंडन: करोनाचा संर्सग जगभरातील २०० देशांमध्ये फैलावला आहे. करोनाचा कहर कधी संपणार असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत असताना संशोधकांनी एक आशादायी बातमी सांगितली आहे. संसर्गाचा 'दि एन्ड' कधी होऊ शकतो, याबाबत सिंगापूरच्या संशोधकांनी आपला निष्कर्ष सांगितला आहे. करोना संसर्गामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्यामुळे काही देशांनी लॉकडाउनचे निर्बंध अटींसह शिथिल केले आहेत. करोनाच्या संसर्गासमोर जगातील अनेक देशांनी हात टेकले आहे. सिंगापूरच्या संशोधकांनी करोनाची महासाथ काही देशांमध्ये संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. सिंगापूर युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिझाइनने आपल्या गणितीय सिद्धांताने करोना संपुष्टात येण्याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रिटनमध्ये आगामी चार महिन्यात करोना संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. तर, इटलीमध्ये २४ ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात येईल. तर, अमेरिकेत ११ नोव्हेंबरपर्यंत करोनाचा संसर्ग संपुष्टात येण्याचा अंदाज आहे. वाचा: वाचा: करोनाच्या महासाथीच्या या शक्यतेनंतरही संशोधकांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. करोना संपुष्टात येणार असल्याच्या अंदाजामुळे लोक कदाचित अधिक निष्काळजीपणे वागण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंटर फॉर एव्हिडेंस बेस्ड मेडिसनच्या एका प्राध्यापकांनी सांगितले की, करोनाबाधित रुग्ण आणि संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर असाच राहिल्यास जून अखेरीसपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी वाचा: