हरयाणा: अमेरिकेहून परतलेल्या ७३ पैकी २१ जणांना करोना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 24, 2020

हरयाणा: अमेरिकेहून परतलेल्या ७३ पैकी २१ जणांना करोना

https://ift.tt/3cZOS0q
हरयाणा: वंदे भारत अभियानांतर्गत अमेरिकेतून हरयाणामध्ये परत आलेल्या ७३ लोकांपैकी २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी २ प्रवाशांचा अहवाल अद्याप संशयास्पद आहे. पंचकुलाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जसजित कौर यांनी ही माहिती दिली आहे. पंचकुलामध्ये अमेरिकेतील सर्व प्रवाशांना क्वारंटीन ठेवण्यात आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना अलग ठेवण्यात आले आहे. अमेरिकेहून आलेले हे सर्व भारतीय १९ मे रोजी देशात पोहोचले. ज्या प्रवाशांचा चाचणी अहवाल कोरोना नकारात्मक आला आहे, अशांनाही अलग ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांना१४ दिवस अलग ठेवल्यानंतरच त्यांना घरी जाऊ दिले जाईल. अमेरिका हा कोरोना सर्वात मोठा फटका बसलेला देश आहे, अशा परिस्थितीत तेथून आलेल्या लोकांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. हे वाचा: हरणामध्ये वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण हरयाणामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ती १,०६७ इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे ७०६ आहे, तर हरयाणामध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. वंदे भारत अभियानांतर्गत परतले भारतीय परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने सुरू केले होते. वंदे भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हे अभियान १७ मे ते ३ जून पर्यंत म्हणजेच १८ दिवस चालणार आहे. या टप्प्यात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरसह एकूण ३१ देशांमध्ये अडकलेल्या लोकांना घरी आणले जात आहे. हे असे देश आहेत जे मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणाने ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत येथून येणार्‍या प्रवाशांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका सर्वाधिक असतो.