नवी दिल्ली : येत्या १ जून पासून २०० विशेष रेल्वेंची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलीय. या रेल्वेसाठी आज (गुरुवार) सकाळी १०.०० वाजल्यापासून करण्यात आलंय. आयआरसीटीसी ()च्या वेबसाईटवर या रेल्वेसाठी बुकिंग सुरू झाल्यानंतर अगदी काही मिनिटांतच सगळ्या सीट बूक झाल्या आहेत. करोना लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वेनं श्रमिक रेल्वेशिवाय १ जून पासून २०० नॉन एसी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय. द्वितीय श्रेणीच्या या रेल्वे असतील. या प्रवासादरम्यानही प्रवाशांना काही गाईडलाईन्स पाळाव्या लागणार आहेत. वाचा : वाचा : रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार, रेल्वेसाठी RAC आणि वेटिंग तिकीटही उपलब्ध होत आहेत. वेटिंग तिकीट मिळालेल्या प्रवाशांना मात्र प्रवास करता येणार नाही. सर्व प्रवाशांची बोर्डिंग स्टेशनवर स्क्रीनिंगही पार पडेल. यात केवळ करोना लक्षणं न आढळलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी मिळेल. यापूर्वी, १२ मेपासून १५ चालवण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी, ११ मे रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून बुकिंग सुरू करण्यात आली होतं. तेव्हाही बुकिंग सुरू झाल्यानंतर IRCTC च्या वेबसाईटवर अनेकांनी उड्या घेतल्यामुळे काही वेळ बुकिंग बंद पडली होती. वाचा : वाचा :