
नवी दिल्ली: उद्या पासून, अर्थात १ जूनपासून देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा समाप्त होऊन ५ वा टप्पा सुरू न होता अनलॉक-१ सुरू होत आहे. हा नवा टप्पा ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाची काल वर्षपूर्ती झाली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. मोदी यांचा हा ६५ वा 'मन की बात' कार्यक्रम आहे. काय म्हणत आहेत पंतप्रधान मोदी हे पाहुया या लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून... Live अपडेट्स... >> जगाशी तुलना केल्यास भारतातील करोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी- मोदी. >> सेवा आणि त्याग हे आमचे आदर्श आहेत, हे देशाने दाखवून दिले आहे- मोदी. >> अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर देशातील जनतेला अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे- मोदी. >> सावधगिरीचे भान ठेवत देशातील विमानसेवा सुरू झाली आहे- मोदी. >> हळूहळू देशातील व्यवहार सुरू होत आहेत- पंतप्रधान मोदी. >> देशात उद्यापासून 'अनलॉक-१' सुरू होत असून, पंतप्रधान मोदी त्याबाबत काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष. >> आपल्या ६५ व्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी साधत आहेत संवाद.