देव सगळीकडे आहे; धार्मिक स्थळे कशाला खुली करायची? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 31, 2020

देव सगळीकडे आहे; धार्मिक स्थळे कशाला खुली करायची?

https://ift.tt/2zCe2E4
नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनंतर आता पुढील काळात अनेक गोष्टी हळूहळू सुरू केल्या जाणार आहेत. याला सरकारने अनलॉक असे म्हटले आहे. याचा पहिला टप्पा ८ जूनपासून सुरू होणार असून यात हॉटेल, मॉल, शॉपिंग सेंटर आणि धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. केंद्राच्या या निर्णयावर एका क्रिकेटपटूने आक्षेप नोंदवल्यामुळे तो आता सोशल मीडियावर ट्रोल होतोय. वाचा- भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शनिवारी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली. या पोस्टमध्ये त्याने अनलॉक १ मध्ये धार्मिक स्थळे खुली करण्याची काय गरज आहे, असा सवाल विचारला. करोना विरुद्धच्या लढ्यासाठी दोन महिन्याहून अधिक काळासाठी सुरू केलेला लॉकडाऊन मागे घेते. काही गोष्टी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या निर्णयावर आकाश चोप्राने आक्षेप घेतला. वाचा- 'मॉल, हॉटेल आदी गोष्टी या आर्थिकदृष्ट्या गरजेच्या आहेत. त्यामुळेच त्या नेहमीसाठी बंद करणे अशक्य आहे. पण आपल्याला धार्मिक स्थळे सुरू करम्याची काय गरज आहे. देव सगळीकडे आहे...होय की नाही?' या ट्विटनंतर सोशल मीडियावर आकाशला युझर्सनी ट्रोल केले. मंदिरात काम करणाऱ्या पुजारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावरून अनेकांनी आकाश चोप्राला प्रश्न विचारला.