सरकारपेक्षा जास्त लोकांची मदत करतोय सलमान! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 8, 2020

सरकारपेक्षा जास्त लोकांची मदत करतोय सलमान!

https://ift.tt/2yGiS2v
मुंबई- करोना महामारीपासून वाचण्यासाठी प्रत्येक देश आणि प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करताना दिसत आहेत. या काळात अनेक सेलिब्रिटींनी मदतीचे हातही पुढे केले. यात सलमान खानचं नाव अग्रणी आहे. सलमान अनेक प्रकारे लोकांची मदत करत आहे. नुकतंच त्याने नावाच्या फूड ट्रकचीही सुरुवात केली. अनेकांनी ट्विटरवर सलमानच्या या कार्याचं कौतुक केलं. मिळत आहेत लाखो आशीर्वाद- सलमान मोठ्या पडद्यावर जसा हिरो आहे तसाच खऱ्या आयुष्यातही आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. नुकताच सलमानचा एक व्हिडिओ समोर आला. यात एक फूड ट्रक गरजूंना अन्नधान्य पुरवताना दिसत आहे. हा ट्रक सलमानने लोकांच्या मदतीसाठी सुरू केला आहे. त्याच्या या कामामुळे त्याला भरभरून आशीर्वाद दिले जात आहेत आणि सोशल मीडियावर त्याचं कौतुकही होत आहे. चाहत्यांनीही केलं कौतुक- शिवसेना- युवा सेनाच्या सदस्यने सलमान खानच्या या कार्याचं कौतुक करणारं एक ट्वीट केलं. यात इतर चाहतेही सलमानचं मन भरून कौतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी सरकारपेक्षा सलमान खानचं जास्त मदत करत असल्याचं कमेन्टमध्ये लिहिलं तर, काहींनी सरकारवर टीकाही केली. सलमान करतोय मोठी मदत- याआधीही सलमानचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात बैलगाड्यांवरून अन्नधान्य गावातील गरिबांपर्यंत पोहोचवलं जात असल्याचं पाहण्यात आलं. एवढंच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक कामगारांनाही त्याने मदत केली. एप्रिल महिन्यात १६ हजार मजूरांच्या अकाउंटमध्ये ४ कोटी ८० लाख रुपये पाठवले.