दिल्ली: १२२ सीआरपीएफ जवानांना करोना; आज आणखी १२ जवान करोनाग्रस्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 2, 2020

दिल्ली: १२२ सीआरपीएफ जवानांना करोना; आज आणखी १२ जवान करोनाग्रस्त

https://ift.tt/3dcfsTP
दिल्ली: केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीफ) आणखी १२ जवानांना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीत करोनाची लागण झालेल्या सीआरपीएफ जवानांची संख्या आता १२२ वर पोहोचली आहे. तर, आणखी १५० जवानांच्या चाचणीचे रिपोर्ट्स येणे बाकी असून ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. करोनाची लागण झालेले हे सर्व जवान एकाच बटालियनचे आहेत. ही बटालियन राजधानी दिल्लीच्या मयूर विहार फेझ-३ येथे तैनात आहे. सीआरपीएफच्या ३१ बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद इकराम हुसेन याचा करोनामुळे २८ एप्रिलला मृत्यू झाला होता. त्यांनी सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. करोनाचा हा विषाणू आता अर्धसैनिक दलापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ५५ वर्षीय हुसेन यांच्या निधनाबाबत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला होता. दरम्यान, देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.