करोना: गेल्या २४ तासांमध्ये देशात आढळले ६,५३५ नवे रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 26, 2020

करोना: गेल्या २४ तासांमध्ये देशात आढळले ६,५३५ नवे रुग्ण

https://ift.tt/3eetzbu
नवी दिल्ली: देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे १ लाख ४५ हजार ३८० वर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज मंगळवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ४,१६७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांचा विचार करता ६,५३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून २४ तासांमध्ये १४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तथापि, आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ६० हजार ४९१ रुग्ण बरे झाले ही दिलासा देणारी बाब आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ४१.६० इतका असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत जगभरात एकूण ५४ लाखांपेक्षा अधिक जणांना करोनाने गाठले आहे. यांपैकी ३ लाख ४५ हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतच करोनामुळे ९८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा: देशाचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सोमवारी एकून २,४३६ नवे रुग्ण आढळले. राज्यात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे ५२,६६७ वर. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ६० रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढून ती १,६९५ पर्यंत पोहोचली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावर बंदी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुरक्षेच्या कारणावरून मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर बंद केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही बंदी तात्पुरत्या स्वरुपात घातली आहे. या औषधाच्या सेवनामुळे रुग्णांच्या मृत्यूची शक्यता वाढते असे एका अभ्यासात आढळून आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे.