मुंबई: करोना व्हायरसपासून बचावासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व जण घरी थांबले आहेत. देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात लोकांनी त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आणि सण घरीच साजरे केले. याला स्टार क्रिकेटपटू देखील अपवाद नाहीत. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर देखील घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सचिनने लग्नाच्या २५व्या वाढदिवसादिवशी पत्नी अंजलीला सरप्राइझ दिले. वाचा- गॉड ऑफ क्रिकेट अशी ओळख असलेल्या सचिनने इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते आंब्यापासून कुल्फी तयार करत आहे. सचिनने व्हिडिओ स्पेशल कुल्फी कशी करायची हे सांगितले. सचिन आणि यांचा विवाह २४ मे रोजी १९९५ साली झाला होता. लग्नाचा २५वा वाढदिवस त्यांनी घरी साजरा केला. पत्नी अंजलीला सरप्राइझ देण्यासाठी सचिनला आईने मदत केली. स्वयंपाक घरात सचिनची आई देखील आहे. वाचा- लॉकडाऊनच्या काळात सचिनने अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. काही जुन्या आठवणींना त्याने उजाळा दिला. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सचिनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ सचिन लिंबू काढत असल्याचे दिसत होते.