अन् २४ तासांत 'त्या' पायलटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 12, 2020

अन् २४ तासांत 'त्या' पायलटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला!

https://ift.tt/2YV1AsY
मुंबई: देशातील रुग्णांची संख्या ७० हजाराच्यावर गेली आहे. तर दोन हजाराच्यावर लोकांचा मृत्यू झाला आहे. रोजच हजारभर करोना रुग्ण सापडल्याच्या बातम्या येत असतानाच जर एखाद्याच्या हातात करोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला तर... त्याच्या पायाखालची जमीन सरकणारच. एअर इंडियाच्या पायलटच्या बाबतीत असंच झालंय. आधी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या पाचही पायलटचे रिपोर्ट दुसऱ्या टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी संध्याकाळी दुसरे रिपोर्ट आले. रविवारी आमच्या सर्व पायलटची तपासणी करण्यात आली होती. त्यात त्यांना करोना व्हायरस नसल्याचं आढळून आलं आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांची पुन्हा तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बोइंग ७८७ विमानावरील हे सर्व असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, एअर इंडियाकडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रविवारी या सर्व पायलटची पहिली चाचणी करण्यात आली होती. त्यात पाच जणांना करोनाचा संसर्ग असल्याचं आढळून आलं होतं. तपासणी किट्समध्येच काही तरी गडबड असावी असं आम्हाला वाटतं, असं सूत्रांनी सांगितलं.