लॉकडाउन लांबणार; सेवा,उत्पादन आणि कृषी क्षेत्रांना फटका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 30, 2020

लॉकडाउन लांबणार; सेवा,उत्पादन आणि कृषी क्षेत्रांना फटका

https://ift.tt/3ciPrBj
प्रतिनिधी : देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी १४ टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा असतो. याच महाराष्ट्रात देशातील रुग्णसंख्येच्या तब्बल ३६ टक्के रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला करोनामुळे मोठा फटका बसला आहे. त्यातही राजाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४५ टक्के एवढं उत्पन्न ज्या जिल्ह्यांमधून येतं, त्या मुंबई, ठाणे आणि पुणे या तीनही जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने तिथले उद्योगधंदे ठप्प आहेत, असं हा अहवाल सांगतो. या संस्थेच्या पाहणीनुसार राज्याच्या उत्पन्नापैकी ५४ टक्के उत्पन्न हे सेवा क्षेत्रातून येतं. हे सेवा क्षेत्र मुंबई महानगर प्रदेशात जास्त आहे. या क्षेत्रातील ६० टक्के उद्योग बंद असल्याने त्याचा परिणाम राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्याशिवाय उत्पादन क्षेत्राचा वाटा २७ टक्के एवढा असून हे क्षेत्र प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि ठाणे या परिसरात एकवटलं आहे. कृषी क्षेत्रालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला असून आंबा, द्राक्षं आणि डाळींब यांच्या उत्पादकांना तब्बल ४० टक्के एवढं प्रचंड नुकसान सोसावं लागणार आहे, असं लेव्हर्स फॉर चेंजने म्हटलं आहे. तसंच देशाची अर्थव्यवस्था मार्च २०२२च्या आधी रुळावर येणं कठीण आहे, अशी भीती व्यक्त केली आहे. या अहवालातील पाहणीनुसार राज्य सरकारने कृषी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी तातडीने पावलं उचलली असल्याने हे क्षेत्र लवकर सावरण्याची शक्यता आहे. पण जुलै महिन्यात राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज असल्याने त्यानंतरच्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचा गाडा रूळावर येणं कठीण आहे, असे या अहवालात म्हटलं आहे. राज्यांबरोबरच या संस्थेने देशातील आर्थिक चित्राचाही अंदाज दिला आहे. या अंदाजानुसार २०२२च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था रूळावर येण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश शहरं २०२१च्या अखेरपर्यंत पुन्हा जोमाने उभी राहतील, असंही हा अहवाल म्हणतो.