सोने झालं स्वस्त ; आज सोन्याच्या दरात घसरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 30, 2020

सोने झालं स्वस्त ; आज सोन्याच्या दरात घसरण

https://ift.tt/2XJZ4nb
मुंबई : आज मुंबईत सोन्याच्या दरात घसरण झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) शनिवारी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४६९२९ रुपये झाला. शुक्रवारी तो ४६९९५ रुपये होता. चांदीचा भाव प्रती किलोला ४८४३५ रुपये आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात टाळेबंदी सुरु आहे. टाळेबंदीचा चौथा टप्पा सुरु असून तो उद्या रविवारी ३१ मे रोजी संपुष्टात येणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून टाळेबंदी वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. goodreturns.in या वेबसाइटनुसार शुक्रवारी दिल्लीत २४ कॅरेटचा भाव ४७३०० रुपये होता. चेन्नईत ४८७९० रुपये तर मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४६९५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४५५०० रुपये असून चेन्नईत ४४७२० रुपये आणि मुंबईत ४५९५० रुपये होता. शुक्रवारी सोने ७०५ रुपयांनी महागले होते. करोना रुग्ण आणि बळींची संख्या वाढू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये धास्ती वाढली आहे. त्यातच हाँगकाँगवरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. अशा स्थितीत कमॉडिटी बाजारात सोने हाच सुरक्षित पर्याय म्हणून पुढे आला आहे. परिणामी सोन्याच्या भावात चढ उतार होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६५५७ रुपये झाला. त्यात १५२ रुपयांची वाढ झाली. चांदी १६७ रुपयांनी महागली असून चांदीचा भाव ४८७२५ रुपये प्रती किलो इतका झाला होता.