राहुल गांधींनी घेतली मजुरांची मुलाखत; शेअर केला व्हिडिओ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 23, 2020

राहुल गांधींनी घेतली मजुरांची मुलाखत; शेअर केला व्हिडिओ

https://ift.tt/3gpF4Pw
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार यांनी हरयाणाहून झांसीकडे पायी निघालेल्या स्थलांतरित मजुरांचे दु:ख जाणून घेतल्यानंतर आज आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी मजुरांशी केलेल्या चर्चेचा व्हिडिओ आज सकाळी ९ वाजता शेअर केला. या व्हिडिओत मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी राहुल गांधी यांना सांगितल्या. 'एकही पैसा खात्यावर जमा झाला नाही' हे स्थलांतरित मजूर ७०० किमीचा प्रवास पायी करत आहेत. त्यांना गाठून राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देत या मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यांच्याशी बोलताना, केंद्र सरकारने तर प्रत्येकाच्या बँक खात्यावर पैसे टाकलेले आहेत, ते आपल्याला मिळाले नाहीत का?, असा प्रश्न केला. मात्र, आम्हाला एक रुपयाही मिळालेला नसल्याचे मजुरांनी सांगितले. ' किती दिवसांचा होणार हे एकदाच सांगायला हवे होते' लॉकडाउनमुळे आमच्या जगण्याचे वांदे झाले असल्याचे मजुरांनी सांगितले. देशात लॉकडाउन अचानक जाहीर करण्यात आला. यामुळे आम्हाला काहीच तयारी करता आली नाही. प्रथम लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर हा लॉकडाउन संपल्यानंतर सर्वकाही सुरू होईल असे आम्हाला वाटले. मात्र लॉकडाउन सतत वाढत गेला आणि आम्ही फसत गेलो. आमचे काम बंद झाले, आमच्याकडील पैसे संपले. आता करायचे काय, जेवायचे कसे असे प्रश्न आमच्यापुढे पडले. पायी चालत जाण्यावाचून मग आमच्यापुढे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही, असे मजूर म्हणाले. पाहा व्हिडिओ: 'लॉकडाउन ५ वर्षांचा लावा, पण स्पष्ट सांगा' केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने लावायला हवा होता की एकदम काही दिवसांचा लावला गेला पाहिजे होता असा पश्न राहुल गांधी यांनी विचारला. त्यावर लॉकडाउन लावण्याआधी काही दिवस आम्हाला कल्पना द्यायला हवी होती. म्हणजे आम्ही गावी चलण्याची तयारी केली असती, असे एक मजूर महिला म्हणाली. लॉकडाउन एकदाच काय तो जाहीर करायला हवा होता. भले मग तो ५ वर्षांचा का असेना, असेही महिला पुढे म्हणाली. राहुल गांधी यांनी १६ मे या दिवशी सुखदेव विहार फ्लायओव्हरजवळ या स्थलांतरित मजुरांशी चर्चा केली. त्यानंतर आपण ही व्हिडिओ २३ मे रोजी सकाळी ९ वाजता प्रसिद्ध करू असे ट्विट करत जाहीर केले होते.