सायकलनं १२०० किमीचा प्रवास; ज्योतीचं इवांकाकडून कौतुक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 23, 2020

सायकलनं १२०० किमीचा प्रवास; ज्योतीचं इवांकाकडून कौतुक

https://ift.tt/2WZKYiJ
आजारी वडिलांना सायकलवर बसवून गुरुग्राम ते बिहार असा सुमारे १२०० किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीच्या जिद्दीचे कौतुक देशभरात होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पनंही ज्योतीची पाठ थोपटली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी तिच्या साहसाचं कौतुक केलं आहे. इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवर ज्योती कुमारीचा फोटो पोस्ट करत तिच्या धाडसाचं व सहनशीलतेचं कौतुक केलं आहे. दरम्यान, १५ वर्षीय ज्योती कुमारीची दखल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियानंही घेतली असून तिला पुढील महिन्यात चाचणीसाठी बोलवलं आहे. सात दिवसांत गाठले घर ज्योतीचे वडील मोहन पासवान हे गुरुग्राम येथे ऑटोरिक्षा चालवतात. पण त्यांना दुखापत झाली आणि त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग खुंटला. त्यांना आपली ऑटोरिक्षा मालकाला परत करावी लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ गावी बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाऊनमध्ये बिहारला जाणं शक्य होत नव्हते. म्हणून शेवटी तिने आपल्या वडिलांना सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांना सायकलच्या मागे असलेल्या 'कॅरिअर'वर बसवून गुरुग्राम ते बिहार हे १२०० किमीचे अंतर तिने अंतर ७ दिवसांत कापले. सायकल फेड्रेशनकडून चाचणीसाठी बोलवण्यात आलं ज्योतीची हिंमत पाहून सायकलिंग फेडरेशनने तिला पुढील महिन्यात चाचणीसाठी बोलावले आहे. सायकलिंग फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओंकार सिंग म्हणाले की, जर चाचणीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली तर दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत तिची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली जाईल