'स्टे सुप्रीम कोर्ट का लाने दे, नहीं तो मोदी का, एक भी खोका...'; दापोलीत ऑडियो क्लिप व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 19, 2022

'स्टे सुप्रीम कोर्ट का लाने दे, नहीं तो मोदी का, एक भी खोका...'; दापोलीत ऑडियो क्लिप व्हायरल

https://ift.tt/sgH8XGU
रत्नागिरी : 'एक भी खोका मे नही रहेगा, स्टे सुप्रीम कोर्ट का लाने दे, नही तो मोदी का लाने दे...तीन तीन करोड का दुकान का भाव आना मंगता है दापोली मे...', असे वक्तव्य असलेली एक कथित ऑडियो क्लीप दापोलीत व्हायरल झाल्याने जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे. दापोली नगरपंचायतचे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या आवाजातील ही क्लीप असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एक मिनिट पंचेचाळीस सेकंदाची ही कथित क्लिप असून उपनगराध्यक्ष खालीद रखांगे कारवाईबाबत अन्य एका इसमाजवळ बोलत आहेत,असे क्लिपमध्ये ऐकू येत आहे. (An alleged audio clip has gone viral in , causing a stir in the district.) दापोली शहरात सध्या खोकेधारकांवर नगरपंचायत प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. त्यामुळे सध्या बिल्डर लॉबी विरुद्ध हातावर पोट असणारे असे चित्र निर्माण झाले आहे. या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेल्या कारवाई विरोधात भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- दापोली नगरपंचायतीत सध्या शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांमधील बिल्डर लॉबीने मोठे षडयंत्र रचून आकसाने ही कारवाई सुरू केल्याचा आरोप भाजपचे युवानेते भाऊ ईदाते यांनी केला आहे. ज्या नगरपंचायतीकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, त्या नगरपंचायतीने दापोली शहरात हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य गोरगरिब खोकेधारकांना उद्ध्वस्त करून व्यावसायिक गाळे काही कोटी रुपयांना विकण्याची चर्चा त्यात सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक उपाशी मेला तरी चालेल, मात्र बिल्डरना कोट्यावधी रुपये मिळाले पाहिजेत, अशी नवीन संकल्पना दापोली शहरात सुरु झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- नगरपंचायतीची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. अशी परिस्थिती गेले काही महिने सुरू असतानाही खोकेवाल्यांना उचलण्यासाठी थेट हायकोर्टातील वकील ५० हजार रुपये देऊन आणल्याची चर्चा सदर क्लिप मध्ये ऐकावयास मिळत आहे. मागील सत्ताधान्यांच्या डोक्यात शिरलेली सत्तेची नशा यावेळच्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात विक्रमी वेळात शिरलेली आहे. रेरासारख्या कायद्यामुळे ही सदर बिल्डर लॉबी दुखावलेली असल्यामुळे, या क्लिप मध्ये 'मोदी' असा उल्लेखही आहे. क्लिक करा आणि वाचा- दापोली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी वेळीच सावध होऊन सर्वसामान्यांना नाडण्याचे सोडून शहरातील मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा दापोली भारतीय जनता पार्टी या सर्व विषयात आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या ऑडियो क्लीपची कोणीतीही पुष्टी करता येत नाही. मात्र या ऑडियो क्लीपबाबत उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याजवळ पत्रकरांनी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर काहीही बोलणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान, आता या खोकेधारकांवरील कारवाईनंतर दापोलीमधील काही अनधिकृत बिल्डिंग, पार्किंग गाळे, दुकाने यांना कोणाचे अभय आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्हायरल क्लिपमुळे कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या लोकांमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.