करोना लस बनवण्यासाठी ICMR-भारत बायोटेकची हातमिळवणी! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 10, 2020

करोना लस बनवण्यासाठी ICMR-भारत बायोटेकची हातमिळवणी!

https://ift.tt/35JyfDq
नवी दिल्ली : करोनानं घातलेल्या धुमाकुळानं अख्ख जग हैराण झालंय. अनेक देश करोना विषाणूवर मात करण्यासाठी लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतातही () आणि (BBIL) या दोन्ही संस्था करोनावर लस शोधण्यासाठी एकत्र आल्या आहेत. कोविड १९ वर औषध किंवा लस तयार करण्यासाठी या दोन्ही संस्था प्रयत्न करणार आहेत. यासहीत शोधण्याच्या दिशेनं भारतानं एक पाऊल पुढे टाकलंय. करोनावर लस विकसित करण्यासाठी पुण्यात नॅशनल इन्सिट्युट ऑफ वायरोलॉजी (NIV) मध्ये जमा करण्यात आलेल्या व्हायरस स्ट्रेनचा वापर करण्यात येणार आहे. हे व्हायरस स्ट्रेन यशस्वीरित्या भारत बायोटेक इंटरनॅशनलकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती ICMR नं दिलीय. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल (BBIL) या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन लस विकसित करण्याच्या उद्दीष्टानं काम सुरू केलंय. या प्रक्रियेत ICMR-NIV कडून BBIL ला योग्य ते सहकार्य करण्यात येईल. व्हॅक्सीन डेव्हलपमेंट, अॅनिमल स्टडी आणि क्लिनिकल ट्रायल तेजीनं करण्यासाठी ICMR आणि BBIL परवानग्या मिळवण्याचंही काम लवकरात लवकर करतील, असं ICMR नं म्हटलंय. वाचा : वाचा : याबद्दल बोलताना भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्ण एला यांनी या प्रोजेक्टवर काम करणं हे आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचं म्हटलंय. यापूर्वी २० एप्रिल रोजी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीकडून भारत बायोटेकला 'इनअॅक्टिव्हेटेड रॅबीज वेक्टर प्लॅटफॉर्म'चा वापर करत लस बनवण्यासाठी फंडिगची घोषणा करण्यात आली. तसंच ३ एप्रिल रोजी भारत बायोटेककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोलिओसारखीच एका थेंबाच्या 'CoroFlu'वर काम सुरू आहे. मनुष्यासाठी सुरक्षित असलेल्या एका लशीवर ते आधारित आहे. वाचा : वाचा :