मुंबई: कांदिवलीत दुमजली चाळीचा भाग कोसळून दोन जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 10, 2020

मुंबई: कांदिवलीत दुमजली चाळीचा भाग कोसळून दोन जखमी

https://ift.tt/2zrclZk
मुंबई: कांदिवली पश्चिमकेडील एका बैठ्या चाळीतील घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चाळीतील दोन रहिवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवानं कसलीही जीवितहानी झालेली नाही. कांदिवलीतील लालजी पाडा येथील सबरिया मशिदीच्या मागच्या बाजूला असलेल्या दीपज्योती चाळीचा एक भाग सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. अचानक मोठा आवाज झाल्यानं चाळीत घबराट पसरली. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांसह एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. तोपर्यंत स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन नागरिकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं होतं. तरीही सात लोक एक घराच्या दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. अग्निशमन व एनडीआरएफच्या जवानांनी ग्रील तोडून या सात जणांची सुखरूप सुटका केली. बचावकार्य पूर्ण झालं असून आता ढिगाऱ्याखाली कोणीही अडकलेलं नसल्याची माहिती आहे. अपघात नेमका कशामुळं घडला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.