मुंबईः करोना संकटामुळं देशासमोर आर्थिक आव्हान उभं राहिलं आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. अभियानामुळं कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानावर वादग्रस्त अभिनेता उर्फ केआरकेनं उपरोधिक टोला लगावला आहे. अर्थव्यवस्था संकटात असताना 'विकासचा छोटा भाऊही आला', असं म्हणत त्यानं सरकारवर निशाणा साधला आहे. केआरके नेहमी त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळं चर्चेत असतो. यावेळी त्यानं थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. त्यानं नुकतंच एक ट्विट केलं आहे. 'एक तर, सगळे व्यवसाय ठप्प आहेत आणि अशातच विकासचा छोटा भाऊ आला आहे, आत्मनिर्भर, आता कळत नाहीये याचं करायचं तरी काय?' असं ट्विट केआरकेनं केलं आहे. यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी याअगोदर जाहीर केलेलं मदत पॅकेज आणि आरबीआयचे निर्णय यांसहीत २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती . 'स्वावलंबी भारता'चं उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही घोषणा करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.