मुंबई: राज्यातील करोनाबाधितांमध्ये गुरुवारी ५८३ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या आता साडेदहा हजारांवर गेली आहे. यापैकी १७७३ रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स : >> महाराष्ट्र दिन: सोशल डिस्टन्सिंगची पुरेपूर काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले हुतात्मा स्मारकास अभिवादन >> करोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून ध्वजारोहण... औरंगाबादेतील ध्वजारोहण सोहळ्याचं हे दृश्य >> राज्यात आतापर्यंत १७७३ रुग्णांवर यशस्वी उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती >> महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या साडेदहा हजारांपर्यंत