नवी दिल्ली : अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या आणि दौऱ्यासाठी दिल्लीहून निघालेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी चक्रीवादळामुळे बंगालचं झालेलं नुकसान पाहण्याचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. पश्चिम बंगालमध्ये अम्फानच्या तडाख्यात तब्बल ७२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केवळ कोलकातामध्ये १९ जणांचा मृत्यू झालाय. LIVE अपडेट : >> पंतप्रधान मोदी ११.२० मिनिटांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रभावित क्षेत्राचा हवाई सर्व्हे करणार आहेत. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत ते एक बैठकदेखील करतील. त्यानंतर दुपारी १.३० मिनिटांनी ते ओडिशाकडे रवाना होतील. >> सकाळी १०.४५ पर्यंत पंतप्रधान दमदम विमानतळावर पोहचतील. यानंतर १०.५० मिनिटांनी ते बशीरघाटाकडे जातील. >> पंतप्रधान मोदी दिल्लीहून बंगालसाठी रवाना झालेत. >> पश्चिम बंगालच्या दौऱ्या निमित्तानं पंतप्रधान मोदी तब्बल ८३ दिवसानंतर दिल्लीतून बाहेर पडत आहेत. याअगोदर पंतप्रधानांनी २९ फेब्रुवारी रोजी प्रयागराज आणि चित्रकूट दौरा केला होता.