'पाटलांनी 'केरळ मॉडेल'चा नीट अभ्यास केलेला दिसत नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 22, 2020

'पाटलांनी 'केरळ मॉडेल'चा नीट अभ्यास केलेला दिसत नाही'

https://ift.tt/3bN7Upq
मुंबई: करोनाच्या बाबतीत केरळकडे बोट दाखवून महाराष्ट्र सरकारवर टीका करणारे भाजपचे नेते यांच्यावर शिवसेनेनं तोफ डागली आहे. 'पाटील यांनी ''चा नीट अभ्यास केलेला दिसत नाही,' असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. (Shiv Sena on Kerala Model) साथीची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा भाजपचा आरोप आहे. सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ भाजपनं '' हे आंदोलन पुकारलं आहे. 'राज्यातील जनतेनं आपापल्या घराबाहेर पडून काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा,' असं आवाहन भाजपनं केलं आहे. ठाकरे सरकारच्या अपयशाचा पाढा वाचताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केरळचं उदाहरण दिलं आहे. करोना नियंत्रणाच्या बाबतीत केरळला जमले ते महाराष्ट्राला का जमू शकले नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. या टीकेला शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. 'पाटील यांनी ‘केरळ मॉडेल’चा नीट अभ्यास केलेला दिसत नाही. केरळचे मुख्यमंत्री विजयन हे केंद्राच्या सूचना पाळत नाहीत व पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच्या व्हिडिओ बैठकांत सामील होणे म्हणजे वेळेचा अपव्यय असे मानणाऱ्यांपैकी आहेत. मोदी यांच्या बरोबरच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्याने विजयन हे पंतप्रधानांच्या व्हिडिओ चर्चेत सामील होत नाहीत, असं त्यांच्या सरकारचं म्हणणं आहे. याउलट महाराष्ट्र सरकार पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्याशी समन्वय साधून काम करीत आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी महाराष्ट्रापेक्षा केरळात जाऊन ‘रणांगण’ गाजवायला हवे,' असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. 'पाटील-फडणवीस मंडळींनी महाराष्ट्रासंदर्भात जे प्रश्न निर्माण केले आहेत, ते सर्व केंद्राशी संबंधित आहेत. खरंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीस पाठवून त्यांच्या हाती दिल्लीहून मंजूर करून घ्यायच्या कामाची यादी सोपवायला हवी. महाराष्ट्राची चिंता करणाऱ्या पाटील-फडणवीसांनी ही सर्व कामे व योजना, महाराष्ट्राच्या वाट्याचे पाच-पन्नास हजार कोटी रुपये घेऊन यावेत. महाराष्ट्राची मालकी कुणा एका-दोघा पक्षांची नाही. महाराष्ट्रात ‘काळतोंडे’ आंदोलन करण्यापेक्षा हे विधायक काम बरे,' अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.