काश्मीर: पाककडून गोळीबार, एक भारतीय जवान शहीद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 14, 2020

काश्मीर: पाककडून गोळीबार, एक भारतीय जवान शहीद

https://ift.tt/3hqW8F9
पुंछ: जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. तर, आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर सैनिकी कारवाया सुरू केल्या आहेत. पुंछ जिल्ह्यातील किर्णी सेक्टरमधील शाहपूरजवळ पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी झाले. पाकिस्तानकडून पुंछमध्ये गोळीबार पुंछ जिल्ह्यातील किर्णी सेक्टरमधील शाहपूरजवळ पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी झाले. गोळीबार आणि मोर्टारने पाकिस्तानने भारतीय चौक्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, मात्र या गोळीबाराच्या धुमश्चक्रीत एक जवान शहीद झाला, तर दोन जखमी झाले. नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या या कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या उत्तर देताना भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या बऱ्याच चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. पाकने १२ जूनलाही केले शस्त्रसंधीचे उल्लंघन १२ जून रोजी पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या बाजूने दोन क्षेत्रातील चौक्यांवर आणि खेड्यांमध्ये गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या कारवाईबाबत लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ एका आठवड्यापासून नियंत्रण रेषेजवर गोळीबार करीत आहे. सुरक्षित ठिकाणी गेले लोक गेल्या गुरुवारी, पाकिस्तानी सैन्याने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला होता. याशिवाय गेल्या एका आठवड्यात अनेक घरांचे नुकसान झाले असून लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.