नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांनी श्रमिकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी बॉलिवूड अभिनेता याच्याकडे मदत मागितलीय. यावरूनच यांनी आमदार महाशयांवर आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईत अडकून पडलेल्या मध्य प्रदेशच्या रीवा आणि सतना जिल्ह्यातील रहिवाशांची एक यादी बनवून ट्विट केलीय. या ट्विटमध्ये त्यांनी अभिनेता सोनू सूद यांच्याकडे मदतीची मागणी केलीय. यावर अलका लांबा यांनी 'देशात आणि राज्यात यांच्याच पक्षाचं सरकार असूनही हे सोनू सूदकडे मदतीची मागणी करत आहेत' असं म्हणत टीका केलीय. इतकंच नाही तर राजीनामा देऊन टाकण्याचा सल्लाही अलका लांबा यांनी आमदार महाशयांना देऊन टाकलाय. ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत अलका लांबा यांनी लिहिलंय 'डोळ्यांवर विश्वास बसत नाही. जे स्वत: आमदार आहेत आणि माजी मंत्रीही राहिलेत, मध्य प्रदेशात आणि देशात यांचंच सरकार आहे, मुख्यमंत्री / पंतप्रधान यांच्याच पक्षाचे आहेत, महाराष्ट्रातही यांचे खासदार आणि आमदार आहेत. तरीदेखील हे मदत सोनू सूदकडे मागत आहेत. थोडी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन घरी बसा, चांगलं होईल'. भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये सोनू सूदकडे मदत मागताना 'मध्यप्रदेशातील रीवा आणि सतना रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत अडकलेले आहेत आणि अजूनही आपल्या घरी पपरतू शकलेले नाहीत. कृपया यांना पोहचवण्यासाठी आमची मदत करा' असं म्हटलं होतं. यावर सोनूनंही शुक्ला यांना मदतीचं आश्वासन दिलंय.